
घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पाठलाग करून पकडले
भडगाव शहरातील घटना
भडगाव I प्रतिनिधी
बंद घरात चोरी करण्याचं बेतात असणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडून भडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याचा दुसरा साथीदार मात्र पसार झाला आहे . शहरातील भवानी बाग परीसरातील रामकृष्ण नगर रहिवाशी आत्माराम चिंधा पाटील हे आपल्या पत्नी सह मुली कडे बाहेर गावी गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार प्रविण संभाजी पाटील (वय ३५) रा. बाम्हणे ता. एरंडोल, विभोर जुलाल जाधव रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोलहे दोघे चोरटे करीत होते. यावेळी या घरा समोरील रहिवाशी संदीप भास्कर मराठे (मुगटीकर), यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी आरडाओरड करून इतर रहिवाशांना सांगितले.
यावेळी झालेल्या आवाजाने चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची होन्डा शाहीन मोटार सायकल क्रमांक एम. एच. १९- डी.ए. ८३८६ घेऊन पेठ चौफुलीकडे पळ काढला. यावेळी संदीप भास्कर मराठे यांनी पेठ चौफुलीवर थांबलेले आपल्या काही मित्रांना व पोलीस स्टेशनला हा प्रकार सांगितला. यावेळी संदीप मराठे, हर्षल लालसिग पाटील, रात्री गस्तीवर असलेले पीएसआय कीशोर पाटील एएसआय चालक राजेंद्र पाटील यांनी या चोरट्यांचा पाठलाग करुन पेठ चौफुलीवर दोन चोरट्यां पैकी प्रविण संभाजी पाटील (वय ३५) रा. बाम्हणे ता. एरंडोल, यांस पकडण्यात यश आले
. तर दुसरा चोरटा विभोर जुलाल जाधव रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल हा पळून गेला. .. प्रविण पाटील आणि विभोर जुलाल जाधव रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल यादोघे चोरट्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान प्रविण पाटील (वय ३५) रा. बाम्हणे ता. एरंडोल या चोरट्याला पाचोरा न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास पो. हे काँ. विजय जाधव हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम