घरात कोणीही नसतांना प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

बातमी शेअर करा...

घरात कोणीही नसतांना प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव प्रतिनिधी घरी कोणीही नसतांना सुभाष मोतीराम पाटील (वय ५३, रा. नवनाथ नगर, हरिविठ्ठल नगर) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील हरिविठ्ठल नगरात सुभाष पाटील हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास आहे. सर्वजण नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास कामावर निघून गेले होते. त्यामुळे सुभाष पाटील हे घरी एकटेच होते. दुपारच्या सुमारास घरी कोणीही नसतांना सुभाष पाटील यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

सायंकाळी त्यांचा मुलगा घरी आला असता, त्याला वडील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. वडीलांचा मृतदेह बघताच त्याने एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ जितेंद्र राठोड हे घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामाकरुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत सुभाष पाटील यांना मयत घोषीत केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम