
घरी कोणी नसताना प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
घरी कोणी नसताना प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
शिरसोलीतील घटना; एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव – शिरसोली (ता. जळगाव) येथे घरी कोणीही नसताना एकनाथ यशवंत चौधरी (वय ५२) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, ७ मे रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकनाथ चौधरी हे शिरसोली येथे कुटुंबासोबत राहत होते. ते एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. बुधवार दुपारी घरात कोणी नसतानाच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने त्यांच्या मावशी घरी आल्यावर ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ परिसरातील लोकांना याबाबत माहिती दिली.
चौधरी यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम