
घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; चहार्डी गावात शोककळा
घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; चहार्डी गावात शोककळा
जळगाव प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे ८ डिसेंबर रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत ३५ वर्षीय तरुणाचा पाय घसरून मृत्यू झाला. गोपाल हिरालाल कोळी (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव असून घराच्या पायऱ्या चढत असताना अचानक तोल सुटल्यामुळे ते खाली कोसळले.
कौटुंबिकांनी तातडीने त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम