चणकापूर धरणातून १७,९९७ क्युसेक विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

बातमी शेअर करा...

चणकापूर धरणातून १७,९९७ क्युसेक विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कळवण (जि. नाशिक) : चणकापूर धरण पूर्ण क्षमतेला पोहोचल्याने मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) सकाळी १० वाजल्यापासून धरणातून गिरणा नदीकडे १७,९९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणातील पाणीसाठा २४१८ दलघफु म्हणजेच ९९ टक्के इतका भरलेला आहे.

धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू असल्याने साठा झपाट्याने वाढत आहे. परिस्थितीनुसार आगामी तासांत विसर्ग टप्याटप्याने वाढवावा लागू शकतो, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

दरम्यान, हरणबारी आणि केळझर धरण क्षेत्रातही पावसाची तीव्रता कायम आहे. त्यामुळे गिरणा, मौसम आणि आरम नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

➡️ नदीकाठच्या रहिवाशांनी नदीप्रवाहात न जाणे, तसेच आपले पशुधन, शेतीमाल, मोटार पंप व अन्य साहित्य सुरक्षित स्थळी हलविणे आवश्यक आहे.
➡️ संबंधित शासकीय यंत्रणांना सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ही माहिती कार्यकारी अभियंता, मालेगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिद्ध केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम