चर्मकार विकास मंच च्या तालुकाध्यक्षपदी प्रशांत सोनवणे

बातमी शेअर करा...

चर्मकार विकास मंच च्या तालुकाध्यक्षपदी प्रशांत सोनवणे
धानोरा ता चोपडा
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रशांत सुरेश सोनवणे यांची चर्मकार विकास मंच च्या तालुका अध्यक्ष पदी प्रदेश अध्यक्ष संजय खामकर यांनी नियुक्ती केली आहे. यावेळी राज्य सदस्य विश्वनाथ सावकारे,संजय भटकर,संजय वानखेडे,विस्तार अधिकारी विजय पवार,प्रा सुनील निंभोरे,वसंत नेटके,खंडोजी पवार तसेच जिल्ह्यातील समाजबांधव उपस्थित होते.
त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस डी भिरुड,उपाध्यक्ष जे पी सपकाळे,भुसावळ शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील,उपाध्यक्ष अश्विनी कोळी,ग एस संचालक योगेश इंगळे,सचिव जगन्नाथ कोळी,मुख्याध्यापक विनायक तेली,आर आर धनगर,सुनील वानखेडे,प्रशांत नरवाडे,चर्मकार विकास मंच चे अध्यक्ष अर्जुन भारुडे,कार्याध्यक्ष राजेश वाडेकर,सुरेश सोनवणे,दीपक कुलकर्णी,भास्कर सोनवणे,रमेश सोनवणे,शांताराम सोनवणे,लोटन सोनवणे,दिलीप सोनवणे,परशुराम दांडगे,अनिल निंभोरे,वैभव निंबाळकर,अविनाश वानखेडे,प्रशांत चौधरी तसेच समाजबांधव यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी प्रशांत सोनवणे यांनी आपल्या या निवडीबद्दल समाजातील तळागाळातील बांधवांसाठी सर्व सहकार्य करून,विद्यार्थ्यांसाठी योजना बाबत माहिती उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम