चहार्डी औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावाला मंजुरीचे निर्देश

बातमी शेअर करा...

चहार्डी औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावाला मंजुरीचे निर्देश

चोपडा तालुक्यातील औद्योगिक वाढीला गती मिळणार

मुंबई चोपडा l प्रतिनिधी 

चहाडी औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित असल्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी निदर्शनास आणले. त्यावर उद्योगमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

या निर्णयामुळे चोपडा तालुक्यातील औद्योगिक वाढीला गती मिळणार असून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

जळगाव जिल्ह्याचा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या ‘D+ झोन’मध्ये समावेश करण्यासाठी उद्योग विभागात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासास चालना देण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री उदय सामंत होते. पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, राजू भोळे, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, अमोल पाटील, मंगेश चव्हाण, अमोल जावळे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत जळगाव जिल्ह्याचा विदर्भ, मराठवाडा तसेच धुळे, नंदुरबार जिल्ह्यांप्रमाणे ‘D+ झोन’मध्ये समावेश व्हावा, जेणेकरून उद्योजकांना सवलती मिळतील, अशी जोरदार मागणी लोकप्रतिनिधींनी केली. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याचा लवकरच ‘D+ झोन’मध्ये समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम