
चहार्डी येथे रोटरी क्लब तर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
चहार्डी येथे रोटरी क्लब तर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
चोपडा– तालुक्यातील जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा चहार्डी येथे रोटरी क्लब चोपडा यांच्या माध्यमातुन शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. सामाजिक शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारी रोटरी क्लब यांच्या माध्यमातून चहार्डी येथील जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळेत थंडीची तीव्रता लक्षात घेता गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी रोटरी क्लब चोपड्याचे अध्यक्ष आशिष जयस्वाल,माजी अध्यक्ष नितीन अहिरराव,पी.बी.पाटील(प्रोजेक्ट चेअरमन) विलासराव पाटील,संदीप जी सूर्यवंशी,श्रीमती लीना मॅडम,अरुण सपकाळे आदी रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ललिता अनिल बारेला,उपाध्यक्ष सुरेश भील, सदस्य संजय भील,किशोर बारेला,रवींद्र धनगर आदी पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी मोरे यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी पाटील सर यांनी तर आभार व मनोगत जीवन पाटील यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम