चहा विक्रेत्याचा प्रामाणिकपणाचा आदर्श; दोन लाखांचे सोन्याचे ब्रेसलेट मालकाला परत

बातमी शेअर करा...

चहा विक्रेत्याचा प्रामाणिकपणाचा आदर्श; दोन लाखांचे सोन्याचे ब्रेसलेट मालकाला परत

पारोळा (प्रतिनिधी) – तुटपुंज्या उत्पन्नावर संसार चालवणाऱ्या योगेश पाटील या चहा विक्रेत्याने दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट मालकाला परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे.

तहसील कार्यालयासमोर योगेश पाटील यांचे चहाचे दुकान आहे. ९ ऑगस्ट रोजी पारोळा येथील विलास आत्माराम पाटील आणि पिंगळवाडे येथील संदीप दगा पाटील हे खासगी कामानिमित्त आले होते. सकाळी सुमारे ११ वाजता दोघे चहा पिण्यासाठी दुकानात गेले. चहा संपवून बाहेर पडताना, विलास पाटील यांच्या हातातील सुमारे २० ग्रॅम वजनाचे (अंदाजे किंमत २ लाख रुपये) सोन्याचे ब्रेसलेट नकळत पायऱ्यांवर पडले.

काही वेळाने हे ब्रेसलेट योगेश यांच्या नजरेस पडले. त्यांनी ते सुरक्षित ठेवले. तब्बल अडीच तासानंतर ब्रेसलेट हरवल्याचे लक्षात आल्यानंतर, विलास पाटील यांनी शहरातील अनेक ठिकाणी चौकशी केली. शेवटी ते योगेश यांच्या दुकानावर पोहोचले. विचारपूस केल्यानंतर, योगेश यांनी शहानिशा करून ब्रेसलेट परत दिले.

घरची आर्थिक परिस्थिती साधारण असतानाही सोन्याची महागडी वस्तू परत केल्यामुळे योगेश पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम