चाकूचा धाक दाखवून सुनेवर अत्याचार

यावल तालुक्यातील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा...

चाकूचा धाक दाखवून सुनेवर अत्याचार
यावल तालुक्यातील घटनेने खळबळ

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील एका गावात ५६ वर्षीय सासऱ्याने आपल्या ३२ वर्षीय विवाहितेवर वेळोवेळी चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

सदर पीडित महिला सध्या अकोला जिल्ह्यात राहत आहे. तिच्या फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत तिच्या सासऱ्याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणावरून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास यावल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यां करत आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम