चार दुकाने फोडणाऱ्या चोरट्याला अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव :- शहरातील पोलनपेठ येथील तीन दुकाने आणि चित्रा चैकातील कापड दुकान फोडून ऐवज लांबविणारा सराईत गुन्हेगार प्रवीण वसंत सपकाळे (वय ४४, रा. भोलाणे, ता. जळगाव, ह. मु. तानाजी मालुसरे नगर) नाच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या, त्याच्याकडून चोरलेला १९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील चित्रा चौकातील जिल्हा कृषी आद्योगीक सर्वेसर्वा सहकारी संस्थामर्यादीत या कापड दुकानाचे मध्यरात्रीच्या सुमारास कुलून तोडून ८ हजारांची रोकड लांबविली होती. त्यानंतर पुन्हा दि. ६ जानेवारी रोजी पोलनपेठ येथील पॉप्युलर ट्रेडर्स, योगेश प्रोव्हिजन, आणि तिरुपती हेअर आर्ट अशी तीन दुकाने फोडून मुद्देमाल चोरून नेला होता. एकाच भागात चार दुकानांमध्ये चोरी झाल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने तांत्रिक विश्लेषण करीतचोरट्यांची ओळख पटविली. सापळा रचून संशयित प्रवीण सपकाळे याला अटक केली. तपासाच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेश मेढे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, विजय पाटील आणि हरीलाल पाटील यांच्या टीमने तपास सुरु केला. तपासादरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रविण वसंत सपकाळे (वय ४४, रा. भोलाणे, ता. जळगाव) याचा शोध घेतला. त्याला अंजिठा चौफुली जळगाव येथून ताब्यात घेतल्यावर त्याने या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.तपासात त्याच्याकडून एकूण १८९८०/- रुपये जप्त करण्यात आले. आरोपीस जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर यापूर्वी तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम