
चार वर्षीय चिमुरडीचा जिन्यावरून पडून उपचारादरम्यान मृत्यू
चार वर्षीय चिमुरडीचा जिन्यावरून पडून उपचारादरम्यान मृत्यू
पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा शहरातील अंमळनेर रस्त्यालगत असलेल्या पेंढारपुरा भागात गुरुवारी दुपारी एक अत्यंत दुःखद अपघात घडला. घराच्या गच्चीवर खेळत असताना जिन्यावरून पडल्याने कोमल दत्तात्रय वाघ (वय ४), या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल खेळत असताना तिचा पाय घसरल्याने ती जिन्याखाली कोसळली. पडल्याचा जोर इतका होता की तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तिला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच तिची प्रकृती खालावत गेली आणि अखेर प्राणज्योत मालवली. त्यानंतर तिला पारोळा कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेची नोंद पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम