चाळीसगाव येथे समृध्दी शिक्षक फाउंडेशनतर्फे शिवजयंती साजरी

मनोगतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती

बातमी शेअर करा...

चाळीसगाव येथे समृध्दी शिक्षक फाउंडेशनतर्फे शिवजयंती साजरी
मनोगतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती
चाळीसगाव प्रतिनिधी

येथील समृध्दी शिक्षक फाउंडेशन ( एसएसएफ ) ,चाळीसगाव तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समृध्दी शिक्षक फाउंडेशनचे सचिव तथा कविवर्य दिनेश चव्हाण होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रमुख वक्ते प्रा. चंद्रकांत ठाकरे यांनी आपल्या मनोगतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. तर अध्यक्षीय भाषणात दिनेश चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्या विषयी विचार मांडले.कार्यक्रमाला समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश सूर्यवंशी , सचिव तथा कविवर्य दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे ,जेष्ठ संचालक जामराव पाटील , संचालक दिनेश मोरे , सर्वेश सूर्यवंशी , समृध्दी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश सूर्यवंशी यांनी केले. सुत्रसंचलन दिनेश मोरे तर आभार जामराम पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम