चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बातमी शेअर करा...

चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

चाळीसगाव प्रतिनिधी ;– चाळीसगावचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार राजीव देशमुख (वय ५६) यांना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल केले . मात्र धुळे येथे त्यांना उपचारासाठी दाखल केले असता सकाळी धुळे येथील रुग्णालयात निधन झाले.

या घटनेचे वृत्त कळताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यानी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

राजीव देशमुख यांचा नगरसेवक ते आमदारपर्यंतचा प्रवास

स्वर्गीय अनिल देशमुख यांच्या निधनानंतर (दि. ९ जानेवारी २००१) झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते राजीव देशमुख यांनी अवघ्या ३२व्या वर्षी प्रथमच बिनविरोध नगरसेवकपदाची निवड मिळवली. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवे वळण मिळाले.

२००१ च्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कै. लोकनेते अनिल देशमुख शहर विकास आघाडीने मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत सौ. पद्मजा राजीव देशमुख या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, तर राजीव देशमुख यांनी वार्ड क्र. ९ मधून पुन्हा विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली.

यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत **राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)**कडून उमेदवारी मिळाल्यानंतर राजीव देशमुख यांनी थेट विधानसभेत प्रवेश केला आणि चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत आणि संघटनप्रिय नेते म्हणून त्यांची ख्याती आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम