चाळीसगावमध्ये महिला प्राचार्यावरअत्याचार

मध्यप्रदेशातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

चाळीसगावमध्ये महिला प्राचार्यावरअत्याचार

मध्यप्रदेशातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यावर कथित अत्याचार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मध्यप्रदेशातील राजासिंग अग्निदेवसिंग चव्हाण या इसमाविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिला प्राचार्याचा पती सध्या एका गुन्ह्यात कारागृहात आहे. त्याचदरम्यान, त्यांची ओळख राजासिंग चव्हाण या संशयिताशी झाली. पीडित महिलेच्या पतीनेच संशयितास पत्नीचा संपर्क क्रमांक दिला होता.

ऑक्टोबर २०२४ मध्ये चव्हाण हा एका स्थानिक पुढाऱ्याच्या ओळखीतून चाळीसगाव येथे आला आणि त्यानंतर काही काळ पीडितेच्या वाहनाचा चालक म्हणून काम करू लागला. डिसेंबर २०२४ मध्ये, महाविद्यालयात असताना पीडित महिलेशी वाद घालून तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप आहे. महिलेला वाहनातून जबरदस्तीने लॉजवर नेऊन, तिच्यावर कथित अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर आरोपीने लॉजवरील कथित व्हिडीओ आणि फोटो काढून पीडितेला सोशल मीडियावर ते प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेकडून हप्त्याने सुमारे ३ लाख ३० हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संशयिताविरोधात अत्याचार, फसवणूक व धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करत आहेत.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम