चाळीसगावमध्ये विवाहितेची आत्महत्या

पतीसह तीन जणांना अटक

बातमी शेअर करा...

चाळीसगावमध्ये विवाहितेची आत्महत्या

पतीसह तीन जणांना अटक

चाळीसगाव प्रतिनिधि

शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीसह सासरच्या व्यक्तींनी वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यामुळे विवाहितेने आत्महत्या केली . त्यामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पतीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ७६/२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ८५, ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पती राहुल कचरु आल्हाट (तलाठी, महसूल विभाग), सासू मायाबाई कचरु आल्हाट, आणि दिर तेजस कचरु आल्हाट (सर्व रा. चाळीसगाव) यांचा समावेश आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच, एका अनोळखी महिला आरोपीच्या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम