चाळीसगावात घरफोडी; ३.८२ लाखांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा...

चाळीसगावात घरफोडी; ३.८२ लाखांचा ऐवज लंपास

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

 

चाळीसगाव : शहरातील पोतदार शाळेच्या पाठीमागील श्री अपार्टमेंटमधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २८ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालक कंपनीत, कुटुंब गावी

रघुविरसिंग रामसिंग राजपूत हे भारत वायर रोप कंपनीत कार्यरत असून, ते श्री अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. २०३, छायादिग्राम येथे राहतात. सध्या त्यांची पत्नी व मुले राजस्थानमध्ये पारंपरिक कार्यक्रमानिमित्त गेले असून घर बंद होते.

 

२८ एप्रिल रोजी राजपूत हे सकाळी ९ वाजता घर बंद करून कामावर गेले. सायंकाळी ६ वाजता परत आल्यानंतर, त्यांनी पाहिले असता घराचा मुख्य दरवाजा व लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडलेले होते. बेडरूममधील कपाट उघडून त्यातील रोख १५ हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३.८२ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी राजपूत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम