
चाळीसगावात बनावटी गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद
चाळीसगावात बनावटी गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद
चाळीसगाव प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली असून, १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २.२० वाजता गुप्त माहितीनुसार एका तरुणाला बनावटी गावठी पिस्टलसह अटक करण्यात आली.
छाजेड ऑइल मिलच्या मागील घाटरोड परिसरात नाकाबंदी करून पोलिसांनी संशयिताला पकडले. त्याची ओळख मयूर राजू मोरे (रा. प्रभात गल्ली, चाळीसगाव) अशी असून, त्याच्याकडून मॅगझीनसह ३२ हजार रुपये किंमतीचा बनावटी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश सायकर आणि त्यांच्या पथकाने केली. यामध्ये समीर पाटील, निलेश पाटील, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, केतन सुर्यवंशी, नरेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, कल्पेश पगारे, विलास पवार व गोपाल पाटील यांचा समावेश होता.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ४३९/२०२५ दाखल करण्यात आला असून, हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार कलम ३७(१)(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम