
चाळीसगावात ४५ लाख खंडणीप्रकरणी दोन आरोपी ताब्यात
चाळीसगावात ४५ लाख खंडणीप्रकरणी दोन आरोपी ताब्यात
चाळीसगावात ४५ लाख खंडणीप्रकरणी दोन आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील वाघले गावातील गणेश ताराचंद राठोड (वय ४२) यांचे ३० एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून ४५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. अपहरणकर्त्यांनी राठोड यांना मारहाण करून त्यांचे व्हिडिओ मुलाला पाठवत दबाव टाकला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर कारवाईने १२ तासांत राठोड यांची सुटका करत दोन आरोपींना अटक केली.गणेश राठोड यांचा मुलगा अनिल राठोड याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीवरून आरोपी जयेश दत्तात्रय शिंदे (वय २८, रा. सैनिक कॉलनी, चाळीसगाव) आणि श्रावण भागोरे (रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव) यांना ओळखले गेले.पोलिसांना आरोपी मनमाड रेल्वे स्थानकाकडे मोटारसायकलवरून जाताना दिसले. ५ किमीच्या पाठलागानंतर शेतातून पळणाऱ्या दोन्ही आरोपींना पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी कबूल केले की, राजू पाटील (रा. डोंबिवली) आणि सोनू (रा. मुंबई) यांच्या सांगण्यावरून अपहरण केले. राठोड यांना पाटणा गावाजवळील शेतशेडमध्ये बांधून ठेवले होते आणि नंतर लासलगावजवळील जंगलात सोडले होते.पोलिसांनी जंगलात शोधमोहीम राबवून जखमी गणेश राठोड यांना ताब्यात घेतले आणि वैद्यकीय मदत दिली. अटक आरोपी पोलीस कोठडीत असून, फरार राजू पाटील आणि सोनू यांचा शोध सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल, निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. शेखर डोमोळे यांच्या पथकाने केली. पथकात संदीप पाटील, मुरलीधर धनगर, महेश पाटील, सागर पाटील, भूषण शेलार, ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील आणि दीपक चौधरी यांचा समावेश होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम