चाळीसगावात ८२ वर्षीय वृद्ध महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपीला अटक

बातमी शेअर करा...

चाळीसगाव: तालुक्यातील एका गावात ८२ वर्षीय वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल बापू केदार (वय ३०) या तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री घडली. रात्री १० वाजता वृद्ध महिला घराच्या ओट्यावरील खाटेवर झोपली होती. मध्यरात्री सुमारे साडेतीन वाजता राहुल केदारने अचानक येऊन त्यांना मिठी मारून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

वृद्ध महिलेने आरडाओरडा करताच त्यांचा मुलगा, सून आणि नातू बाहेर आले. त्यांनी काठ्यांनी मारून महिलेला त्याच्या तावडीतून सोडवले. या घटनेनंतर राहुल केदारने घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी पीडित महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात राहुल केदारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम