चाळीसगाव-काजगाव रस्त्यावर लाकूड वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने पकडला

बातमी शेअर करा...

चाळीसगाव-काजगाव रस्त्यावर लाकूड वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने पकडला

चाळीसगाव, 27 मे 2025: चाळीसगाव वनपरिक्षेत्रात चाळीसगाव ते काजगाव रस्त्यावर 25 मे रोजी वन विभागाच्या पथकाने गस्त घालताना परवाना नसलेले लाकूड वाहतूक करणारा ट्रक (एमएच-11/एम-4323) ताब्यात घेतला. ट्रक चालक शेख इरफान शेख शफी (रा. मालेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक प्रविण ए. आणि सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, ललित पाटील, अजय महिरे, भटू अहिरे, सी. व्ही. पाटील आणि आर. बी. पवार यांच्या पथकाने केली. ट्रकसह लाकडांचा साठा जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम