चाळीसगाव तालुक्यात ९० पुरुषांनी घेतला ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ

बातमी शेअर करा...

चाळीसगाव तालुक्यात ९० पुरुषांनी घेतला ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ

चाळीसगाव : राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा एकट्या चाळीसगाव तालुक्यात एक लाखांहून अधिक महिला लाभ घेत आहेत. मात्र, या योजनेचा गैरफायदा घेत तब्बल ९० पुरुषांनी स्वतःला महिला दर्शवून लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून लाडकी बहिण

योजनेची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती किंवा प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेत ५२९ पुरुषांनी या योजनेत घुसखोरी केल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील ९० पुरुषांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी यादीची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित पुरुष लाभार्थ्यांकडून

योजनेअंतर्गत घेतलेली संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे. तसेच फसवणूक सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे योजनेचा गैरलाभ घेतलेल्या पुरुषांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत चाळीसगाव येथील महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधला असता, या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम