
चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक : भाजपाचा विजयी झेंडा; नगराध्यक्षपदी प्रतिभा चव्हाण
चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक : भाजपाचा विजयी झेंडा; नगराध्यक्षपदी प्रतिभा चव्हाण
चाळीसगाव, प्रतिनिधी
चाळीसगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपले वर्चस्व कायम ठेवत एकूण ३६ जागांपैकी २४ जागा जिंकल्या आहेत. शहर विकास आघाडीला १० तर अपक्षांना २ जागा मिळाल्या. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांनी निकटच्या प्रतिस्पर्धी पद्मजा देशमुख यांचा ६,०१२ मतांनी पराभव करत विजय मिळवला.
नगराध्यक्ष पदासाठी मिळालेली मते :
- प्रतिभा चव्हाण (भाजप) : ३२,२३८ (विजयी)
- पद्मजा देशमुख : २६,२२६
- राहूल जाधव : ४३४
- समाधान पाटील : ३५३
भाजपाने बहुसंख्य प्रभागांमध्ये दणदणीत यश मिळवले. प्रभागनिहाय काही प्रमुख निकाल :
- प्रभाग १ अ : करणसिंग ईश्वरसिंग राजपूत (भाजप) – २,२४६ मते (फरक ३८१)
- प्रभाग १ ब : मनीषा शेखर पाटील (भाजप) – २,२६६ मते (फरक २८१)
- प्रभाग ४ अ : हर्षल चौधरी (भाजप) – २,२८६ मते (फरक १,६९९)
- प्रभाग ४ ब : प्राजक्ता कोठावदे (भाजप) – १,८५७ मते (फरक ८७१)
- प्रभाग ५ अ : रूपाली प्रभाकर चौधरी (भाजप) – २,६९० मते (फरक १,४३२)
- प्रभाग १३ अ : फकिरा बेग मिर्झा (भाजप) – २,३५० मते (फरक १,६२६)
शहर विकास आघाडीनेही काही प्रभागांमध्ये चांगली कामगिरी केली :
- प्रभाग २ अ : राहुल म्हस्के – १,३८० मते (फरक २२५)
- प्रभाग ७ अ : स्वाती राखुंडे – २,०३५ मते (फरक ५७७)
- प्रभाग १४ अ : इमरान शब्बीर शेख – २,००६ मते (फरक २५)
अपक्ष विजयी :
- प्रभाग ७ ब : राजेंद्र रामदास चौधरी – १,४२८ मते (फरक ३७३)
- प्रभाग १२ ब : सायली रोशन जाधव – २,३६७ मते (फरक १,१८५)
एकूण जागा :
- भाजप : २४
- शहर विकास आघाडी : १०
- अपक्ष : २
निकाल जाहीर होताच भाजप कार्यालयासह शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण यांचे समर्थकांनी अभिनंदन केले.
या विजयामुळे चाळीसगावच्या विकासाला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. भाजपाच्या या दमदार कामगिरीने स्थानिक राजकारणात पक्षाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम