चाळीसगाव बसस्थानकात कंडक्टरला बेदम मारहाण

बातमी शेअर करा...

चाळीसगाव बसस्थानकात कंडक्टरला बेदम मारहाण

चाळीसगाव : जामनेरची बस कोठे लागते, यावरून

चाळीसगाव ते सूरत बसच्या कंडक्टरशी वाद घालून शिवीगाळ करून त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. चाळीसगाव ते सुरत बस (एमएच- २०, बीएल- ३००४) चे कंडक्टर रवींद्र भिला तिरमली (रा. राखुंडेनगर, मालेगाव रोड, चाळीसगाव) हे सोमवारी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास बस स्थानकात बसजवळ उभे होते. या वेळी एक प्रवासी त्यांच्याजवळ आला, व जामनेर बस कोणती आहे, अशी विचारणा केली. तिरमली यांनी आपणास माहित नसल्याचे सांगताच त्याने जोराने ओरडून तुम्ही काय करतात, असे म्हटले. त्यास समजावले असता त्याने तिरमली यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. हा प्रकार सुरू असतानाच त्या प्रवाशाने फोन लावला. त्यानंतर तीन ते चार जण आले व त्यांनी कंडक्टर तिरमली यांच्यासह भांडण सोडवण्यासाठी आलेल्या इतरांना मारहाण केली. तसेच तुम्ही रस्त्यावर कसे गाड्या चालवता, तुम्हाला पाहतो, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर वाहक रवींद्र तिरमली यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रमेश अण्णा व अन्य तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम