चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारात ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन

बातमी शेअर करा...

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारात ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन

चाळीसगाव प्रतिनिधी: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे पोलीस स्टेशनच्या आवारात भव्य देशभक्तीपर सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात १०० ते १५० नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा वाढीस लावणाऱ्या या कार्यक्रमाला उपविभाग पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक वृंद, ए.बी. हायस्कूलचे विद्यार्थी, तसेच पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीत गायनाच्या वेळी पोलीस स्टेशनचा संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारून गेला होता. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचण्यास मदत झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम