
चाळीसगाव MIDC ‘D+’ झोनमध्ये समाविष्ट; औद्योगिक विकासाला नवे दिशा!
चाळीसगाव MIDC ‘D+’ झोनमध्ये समाविष्ट; औद्योगिक विकासाला नवे दिशा!
मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत चाळीसगाव MIDC चा ‘D+’ झोनमध्ये समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक नकाशावर चाळीसगाव ठळकपणे अधोरेखित होणार आहे.
या बैठकीत उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी चाळीसगाव तालुक्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक निर्णय घेण्यात आले.
चाळीसगाव MIDC मध्ये सध्या भारत वायररोप, गुजरात अंबुजा, बिरला प्रीझिशन यांसारख्या नामांकित कंपन्या कार्यरत असून, येथील रेल्वे व महामार्ग सुलभ कनेक्टिव्हिटीमुळे उद्योगवाढीस पोषक वातावरण आहे. मात्र, D+ झोनमध्ये समावेश नसल्यामुळे येथे मोठे उद्योग येण्यास अडथळा निर्माण होत होता. विविध सरकारी योजना, अनुदान व सवलती याचा लाभ स्थानिक उद्योजकांना मिळत नव्हता.
नवीन निर्णयामुळे चाळीसगाव MIDC ला खालीलप्रमाणे लाभ होणार आहेत:
उद्योगांना ६०% ते ८०% प्रोत्साहनपर अनुदान.
वीज दर व कर सवलती.
मोठ्या प्रमाणात औद्योगिक व इतर गुंतवणुकीला चालना.
स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी.
स्थलांतराचा दर कमी होण्यास मदत.
कृषीमालावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन.
जिल्ह्यातील औद्योगिक व वाणिज्यिक परिसंस्थेला नवे बळ.
या निर्णयामुळे चाळीसगाव MIDC उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम