चिंचोलीत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रक्चर योजनेतून ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट मंजूर

बातमी शेअर करा...

चिंचोलीत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रक्चर योजनेतून ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट मंजूर

गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न • नवीन इमारतीच्या कामाची पाहणीही

जळगाव  चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ५० खाटांच्या क्रिटिकल केअर युनिट इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.

या वेळी खासदार सौ. स्मिता वाघ, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेची भर

सदर युनिटमध्ये ५० खाटांची सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून, गंभीर रुग्णांसाठी ही इमारत एक महत्त्वपूर्ण आधार ठरणार आहे. आपत्कालीन परिस्थितींमध्ये उपचारांसाठीही हे युनिट उपयुक्त ठरणार आहे.

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ६५० खाटांसह सुरू असून या नव्या युनिटमुळे रुग्णालयातील एकूण खाटांची संख्या ७०० वर जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेची क्षमता व व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

बांधकाम पाहणी व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

भूमिपूजनानंतर मंत्री श्री. महाजन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या टप्प्यांची माहिती घेतली आणि बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, “हा प्रकल्प म्हणजे जळगाव जिल्ह्यासाठी एक मैलाचा दगड असून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा या माध्यमातून मिळणार आहेत.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम