चिखली येथे भारत निर्माण योजनेमध्ये अपहार करणाऱ्या दोघांना अटक व कोठडी

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

चिखली येथे भारत निर्माण योजनेमध्ये अपहार करणाऱ्या दोघांना अटक व कोठडी

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथे भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेत अपहार केल्याप्रकरणी दोन जणांना बुधवारी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की चिखली येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ता विजयकुमार नामदेव काकडे वय 50 यांनी चिखली गावातील भारत निर्माण योजनेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार 21 जानेवारी 2024 रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजयकुमार काकडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा संबंधी शासनाने चिखली ग्रामपंचायतला 4 लाख 48 हजार रुपये मंजूर झाले असताना त्या पैशातून संशयित यांनी चिखली गावात विहिरीपासून जल कुंभ पर्यंत पाईपलाईन केलेले आहे. परंतु आरोपींनी या योजनेअंतर्गत दिलेल्या नाहीत नियम व अटीप्रमाणे काम न केल्याने आणि कामांमध्ये दोन किलोमीटर विहिरीपासून ते उंच जल कुंभापर्यंत पाईपलाईन दाखवली आहे.

परंतु प्रत्यक्षात हे अंतर 800 मीटरचे असून याचे मूल्यांकन तीन लाख 83 हजार होते. त्यामुळे संशयित आरोपींनी संगणमत करून खोटे दस्तावेज द्वारे आठ लाख 23 हजार 822 मूल्यांकन रक्कम दाखवली. त्यामुळे संशयतांनी चार लाख 40 हजार 114 रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी विजयकुमार काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, गटविकास अधिकारी, रावेर पंचायत समिती गट विकास अधिकारी, संतोष सुरवाडे, सुभाष लोखंडे, अशा राजेंद्र कांडेलकर, राजेंद्र प्रभाकर कांडेलकर, आणि पाणीपुरकथा सचिव युसूफ खान गुलाब खान फकीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार बुधवारी 22 जानेवारी रोजीपोलिसांनी आशा राजेंद्र कांडेलकर आणि पाणीपुरवठा समितीचा सचिव असलेल्या युसूफ खान गुलाब खान फकीर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम