चिखली तालुक्यात पावसाचे थैमान तातडीने पंचनामे करून नुसकान भरपाई द्यावी  चिखली क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी

बातमी शेअर करा...

चिखली तालुक्यात पावसाचे थैमान तातडीने पंचनामे करून नुसकान भरपाई द्यावी  चिखली क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी

चिखली  चिखली तालुक्यात आज ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. पावसाच्या या प्रकोपामुळे पांढरदेव, वरखेड, भोरसा भोरशी, सावंगी गवळी, मंगरूळ नवघरे, घनमोड मानमोड, अंबाशी, खैरव अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड ढगफुटी सदृश्य पाणी पडून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे शाळेमध्ये पाणी शिरले, घरात पाणी शिरले, उभे पीक पाण्याखाली आले. जनावरांच्या गोठ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन खूप मोठी हानी झाली प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते राम अंभोरे यांनी केली.

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करून पेरणी करावी लागते. बँकेचे कर्ज घेऊन दाग दागिने ठेवून पेरणी करावी लागते. सोयाबीन कापूस तुर उडीद या पिकांची लागवड केलेली आहे. चिखली तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे उभे पीक मोठ्या प्रमाणात पाण्यात बुडाल्याने खुप मोठ्या प्रमाणात नुसकान होऊन खुप मोठी हानी झाली आहे. अनेकांच्या घरातील अन्न धान्य, घरातील साहित्य कपडे, शेत रस्ते  गावातील रस्ते विजेच्या तारा यांचे सुद्धा नुकसान झाले आहे.

तरी तात्काळ पंचनामे करून नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे राम अंभोरे व भागवत म्हस्के यांनी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम