
चिनावल शिवारातील विहिरीत तरुणाचा मृतदेह; खून की आत्महत्या याबाबत गूढ
चिनावल शिवारातील विहिरीत तरुणाचा मृतदेह; खून की आत्महत्या याबाबत गूढ
रावेर : – तालुक्यातील चिनावल शिवारात सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी एका विहिरीत तरंगणारा तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताची ओळख समीर सुराज तडवी (वय ३०, रा. चिनावल) अशी झाली असून तो गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे.
निखिल पितांबर भारंबे यांच्या शेतातील विहिरीत हा मृतदेह आढळला. समीर तडवी हा ९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह १५ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सापडला. त्यामुळे हा प्रकार खून आहे की आत्महत्या, याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
या घटनेची माहिती साहिल इलमोद्दिन तडवी (वय २६) यांनी सावदा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम