चिनावल येथे धर्मनाथ बीज निमित्ताने सामूहिक नवनाथ पारायण

परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती

बातमी शेअर करा...

चिनावल येथे धर्मनाथ बीज निमित्ताने सामूहिक नवनाथ पारायण

परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती
सावदा प्रतिनिधी

सावदा येथून जवळच असलेल्या चिनावल येथील जागृत नवनाथ मंदिरात दरवर्षी धर्मनाथ बीज च्या दिवशी सामूहिक नवनाथ पारायण सोहळा आयोजित करण्यात येत असतो यावर्षी देखील दि 31 जानेवारी 2025 शुक्रवारी येथे धर्मनाथ बीज निमित्ताने या सामूहिक नवनाथ पारायणाचे आयोजन येथे करण्यात आले होते

सकाळ पासूनच येथे पारायणास बसणाऱ्या भाविकांची गर्दी झाली होती सकाळी साडे आठ वाजे दरम्यान प्रथम स्वामी समर्थ महाराज व श्री दत्तात्रय यांची आरती होऊन संकल्प झाल्यावर या पारायणास सुरवात झाली या पारायणा साठी चिनावल सह सावदा, फैजपूर, रावेर, तसेच भुसावळ, जळगांव , वर्धा आदी ठिकाणाहून भाविक येथे दाखल झाले होते सुमारे पाच हजार भाविकांनी येथे या पारायणास बसले यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती, सायंकाळी पारायण पूर्ण झाल्यावर आरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, या संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी चिनावल ग्रामस्थांनी परिश्रम घेतले

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम