
चुंचाळे फाटा ते सातपुडा पर्वताच्या मार्गाचे भाग्य उघडले
रस्त्याच्या कामाचे आ चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते भूमिपूजन
चुंचाळे फाटा ते सातपुडा पर्वताच्या मार्गाचे भाग्य उघडले
रस्त्याच्या कामाचे आ चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते भूमिपूजन
यावल प्रतिनिधी
तालुक्यातील बुऱ्हाणपूर ते अंकलेश्वर मुख्य मार्गास जोडणाऱ्या चुंचाळे फाटा ते सातपुडा पर्वताच्या मार्गाचे भाग्य उघडले आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चुंचाळे फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्यासाठी अनेक आंदोलने, रास्तारोको होऊन चर्चेत असलेल्या या रस्त्याचे अखेर १५ मार्च २०२५ रोजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्यांनी बांधलेला ० ते ७०० मीटरचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता. मात्र, आमदार सोनवणे यांनी याची दखल घेत पुन्हा संपूर्ण ४.१ कि.मी. रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच चुंचाळे गाव ते गायरान रस्ता असा एकूण १ कि.मी. रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी मंजूर करण्यात आला आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत असून त्यासाठी २९.७६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
या मंजूर रस्त्यामुळे चुंचाळे, बोराळे, गायरान आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे आभार मानले आहेत. या निर्णयावर परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बाजार समितीचे सदस्य सूर्यभान पाटील, दिनेश सोळंके, स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत सर, कोळन्हावीचे लोकनियुक्त सरपंच विकास (गोटू) सोळंके, आबा पाटील सावखेडे, चुंचाळेचे सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच संजय राजपूत, ग्रामपंचायत सदस्य मनोज धनगर, सदस्य कुर्बान तडवी, सदस्य कलिंदर तडवी, लालचंद सोळंके, शिवसेनेचे दीपक कोळी, सुधाकर कोळी, संजय कोळी, सागर मोरे, किरण राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदारप्रा. सोनावणे यांचा सत्कार केला व त्यांचे आभार मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम