चेक बाऊन्स प्रकरणी हरियाणाच्या आरोपीस अटक
केळी व्यापाऱ्याची 21 लाखात केली होती फसवणूक
चेक बाऊन्स प्रकरणी हरियाणाच्या आरोपीस अटक
केळी व्यापाऱ्याची 21 लाखात केली होती फसवणूक
सावदा l प्रतिनिधी
रावेर कोर्टाकडील प्रकरणातील पकड वॉरंट मधील आरोपी जयप्रकाश नारायण गुप्ता, रा. कुंडली बॉर्डर हरियाणा याने सावदा येथील केळी व्यापारी रितेश संतोष पाटील, रा.सावदा
यांचेकडून 21 लाख रुपये किमतीची केळी माल विकत घेऊन त्याचे मोबदल्यात पैसे परत न करता चेक दिला होता.
सदरचा चेक हा बँकेत दाखल केल्यावर बाउन्स प्रकरणी तक्रारदार यांनी रावेर न्यायालयात दाद मागितली होती.
सदर प्रकरणातील आरोपीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सावदा पोलीस स्टेशन यांनी सहाय्यक फौजदार बशीर तडवी व पोलीस हवलदार सिकंदर तडवी असे पथक हरियाणा येथे पाठवून
सदर पथकाने आरोपीचा शोध काढून त्यास शिताफीने अटक करून हरियाणा येथून सावदा येथे आणले. नमूद आरोपिता
न्यायालयात हजर केले असता त्यास सबजेल जळगाव येथे रवाना करण्यात आले.
केळी व्यापाराच्या प्रकरणांमध्ये प्रत्येक शेतकरी ट्रान्सपोर्ट चालक यांनी ओळखीच्या व विश्वासातील व्यापारी यांच्याशी केळीची देवाण-घेवाण करावी.
ज्या व्यापाऱ्यांशी व्यवहार करीत आहेत त्यांची खातर जमा करावी त्यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळता येतील असे आवाहन केले आहे.
हे हि वाचा👇
चोपडा तालुक्यात विकास कामाची गंगा
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम