चोपडा अडावद रस्त्यावर ७७७ किलो गोवंशाचे मांस घेऊन जाणारे वाहन गोरक्षकांनी पकडले

बातमी शेअर करा...

चोपडा अडावद रस्त्यावर ७७७ किलो गोवंशाचे मांस घेऊन जाणारे वाहन गोरक्षकांनी पकडले
चोपडा l प्रतिनिधी
चारचाकी वाहन गोमांस घेऊन जात असल्याची गुप्त माहिती चोपडा येथील गोरक्षकांना मिळाली. त्यांनी सदर गाडीचा पाठलाग केला. त्या वाहकाने चक्क केळीच्या शेतात रस्त्याच्या कडेला दहा फूट खेड्यातील शेतात उतरविली यात ७७७ किलो गोवंशाची मांस जप्त करीत तत्काळ अडावद पोलिसांनी कारवाई केली. यात एकूण चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्राणींन फाउंडेशन नेहा दीदी पटेल या संस्थेच्या गोरक्षकांना दादामाऊली यांनी अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर चारचाकी वाहनात गोवंशाचे मांस घेऊन जात असल्याची खबर दिली. त्यांनी सदर वाहनाच्या पाठलाग सुरू केला. माचला ते वर्डी फाट्याच्या दरम्यान एका फार्महाऊस समोरील महामार्गाच्या खाली केळीच्या शेतात गोमांस असलेले वाहन क्रमांक एम एच ४३ बी बी ०४०९ सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात उतरले. चालक फरार झाला.

सदर गोरक्षकांनी अडावद पोलिसांना फोन करून माहिती दिली. अडावद पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, हवालदार विनोद धनगर, संजय धनगर, अन्वर तडवी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करीत पुढील कारवाई सुरू केली.
उशीरपर्यंत अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम