
चोपडा आगारातून नांदुरीगड यात्रेसाठी जादा बसेस सुरू
आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन
चोपडा आगारातून नांदुरीगड यात्रेसाठी जादा बसेस सुरू
आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन
चोपडा (प्रतिनिधी) – नांदुरीगड येथील सप्तशृंगी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातून ५ एप्रिल रोजी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जादा बसेस सोडण्यात आल्या. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ५ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत नांदुरीगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.याशिवाय, ज्या गावातून थेट गडावर जाण्यासाठी ४४ प्रवासी असतील, त्या गावातूनही थेट बससेवा पुरवली जाईल. चोपडा ते नांदुरीगड या मार्गाचे प्रौढ भाडे ३७३ रुपये, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी हाफ भाडे १८६ रुपये निश्चित करण्यात आले आहे. चोपडा आगारातून सोडण्यात येणाऱ्या या जादा बसेसचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम