चोपडा आगारात नविन पाच BSVI वाहन दाखल

आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

बातमी शेअर करा...

चोपडा आगारात नविन पाच BSVI वाहन दाखल

आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

चोपडा प्रतिनिधि

तालुक्याचे आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या मागणीवरून राज्याचे परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चोपडा आगारास एस टी च्या ताफ्यात नविनच दाखल झालेल्या बी एस6 दहा वाहने देण्याचे जाहीर केले.व त्या अनुषंगाने आज दिनांक २ एप्रिल रोजी नविन पाच BSVI बस मिळाल्याने आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी आमदार लताताई सोनवणे, आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.

आगाराचा संपूर्ण परिसर रांगोळीने तर नविन बसेस फुलांनी सुशोभित करुन बसेसची पुजा करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यींनी शिक्षक दिनेश बाविस्कर व महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम नृत्य सादर करून लक्ष वेधुन घेतले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, माजी उपसभापती एम व्ही पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, संचालक अँड शिवराज पाटील, कैलास बाविस्कर,माजी नगरसेवक महेंद्र धनगर, प्रकाश राजपुत,, गणेश पाटील,कुणाल पाटील,अन्नु ठाकुर,भागवत कोळी, सुरेश पाटील ,योगेश पाटील, प्रताप पाटील, प्रदीप बारी, नंदू गवळी, संदीप पाटील, डॉ वि्क्की सनेर हरीष पवार,दिपक चौधरी, संचालक किरण देवराज, संचालक विजय पाटील,मंगल इंगळे,बबलु पाटील,रावसाहेब पाटील,दशरथ बाविस्कर, अरुण बाविस्कर, शिवाजी कोळी, मयुर धनगर देवाभाऊ चुचाळे, लोटन मिस्तरी, मुकेश कोळी, गुलाब कोळी विठ्ठलभाऊ कठोरा.किरण देवराज, गोपाल देवराज संरपच गंलगी शितल देवराज, पाटील देविदास पाटील,महीला प्रमुख मंगला पाटील, संचालिका कल्पना भरत पाटील,, मनिषा पाटील स्वाती बडगुजर नगरसेविका संध्या महाजन,अनिता शिरसाठ,स्वाती बडगुजर सह शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवाशी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आगार प्रमुख महेंद्र पाटील स्थानक प्रमुख परेश बोरसे,वाहतुक निरीक्षक नितीन सोनवणे, सिध्दार्थ चंदनकर,,लेखाकार ईश्वर चौधरी,अतुल सोनवणे शाम धामोळे काशिनाथ कोळी, मधुसूदन बाविस्कर, नरेंद्र जोशी, कांतीलाल पाटील अनिल बाविस्कर, भगवान नायदे,चंद्रभान रामसिंग, संदिप पाटील,मुन्ना ठाकुर सह कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम