चोपडा आगाराला मिळाल्या पाच ई-बसेस; प्रवाशांसाठी आधुनिक सेवेची सुरुवात

बातमी शेअर करा...

 

चोपडा आगाराला मिळाल्या पाच ई-बसेस; प्रवाशांसाठी आधुनिक सेवेची सुरुवात

आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि माजी आ. सौ. लताताई सोनवणे यांचे विशेष प्रयत्न

चोपडा: चोपडा आगाराच्या प्रवासी सेवेत मोठी भर पडली असून, माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे चोपडा आगाराला पाच नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या आहेत. या बसेसच्या लोकार्पण सोहळा १८ ऑगस्ट रोजी चोपडा बस आगारात मोठ्या उत्साहात पार पडला.

राज्यात आगामी काळात ५ हजार इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. यापैकीच टप्प्याटप्प्याने बसेस विविध आगारांमध्ये दाखल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चोपड्यातील प्रवाशांना या बसेसची प्रतीक्षा होती, ती अखेर संपली आहे. या बसेसमुळे प्रवाशांना प्रदूषणमुक्त, शांत आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.

या इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी आगार परिसरात अत्याधुनिक चार्जिंग स्टेशनची सोय देखील करण्यात आली आहे.

या लोकार्पण सोहळ्यावेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, चोपडा आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बसेसमुळे चोपड्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम