चोपडा ओम शांती केंद्रात दसरा उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

चोपडा ओम शांती केंद्रात दसरा उत्साहात साजरा
चोपडा : दसऱ्याच्या शुभ प्रसंगी चोपडा येथील ओम शांती केंद्रात विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. यानिमित्त विशेष आकर्षण ठरलेली ‘रावण आणि ब्रह्माकुमारीज’ ही अध्यात्मिक नाटिका प्रेक्षकांना अध्यात्माचा संदेश देणारी ठरली.
नाटिकेत ब्रह्माकुमारीजच्या दिव्य शक्तीसमोर राक्षसी वृत्तीचा रावण देखील शरण येतो आणि त्याला दिव्य स्वरूप प्राप्त होते, असा प्रभावी संदेश यातून देण्यात आला. नाटिकेत ब्रह्माकुमारीजची भूमिका शीतल दीदी यांनी साकारली, तर रावणाची भूमिका पंकज भाई यांनी प्रभावीपणे रंगवली. जगदंबा देवीची भूमिका सविता बेन यांनी साकारली. जगदंबा अर्थात दुर्गादेवीची आरती दिनकर सनेर आणि सरोज सनेर या युगलच्या हस्ते संपन्न झाली.
दसरा सणाचे अध्यात्मिक महत्त्व ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दीदी यांनी सांगितले, तर शुभेच्छा करिष्मा दीदी यांनी दिल्या. सकाळी मुरली क्लास संपल्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्वांना भोग प्रसाद वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दीदी यांच्यासह सारिका दीदी, शीतल दीदी, करिष्मा दीदी आदींनी परिश्रम घेतले. दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित हा अध्यात्मिक सोहळा सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम