
चोपडा टपाल विभागाचा सावळा गोंधळ: ग्राहकांना पैसे देण्यास टाळाटाळ.
चोपडा टपाल विभागाचा सावळा गोंधळ: ग्राहकांना पैसे देण्यास टाळाटाळ.
चोपडा ( प्रतिनिधी) शहरातील डॉक्टर आंबेडकर व्यापारी संकुलात असलेल्या टपाल विभागात सावळा गोंधळ सुरू असून, पैशाची देवाण-घेवाण करताना यात कमालीचा गोंधळ उडत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक 11 रोजी सकाळी नऊ वाजेपासून गिरीश नावाचा एक कर्मचारी बाहेर बसून छोट्या मोबाईल ॲप वर पेमेंट वाटप करत होता, एकीकडे माणसांची व एकीकडे बायांची रांग लागलेली असताना मर्यादित वेळेत फक्त दहा वाजेपर्यंत, हातात असलेली कॅश वाटून तो मोकळा झाला. रांगेतील काही महिला व पुरुषांना दहा नंतर पेमेंट देण्यात येणार नाही परवा या असे त्यांनी सांगितले. याचा दस्तूर खुद्द प्रत्यय ज्येष्ठ पत्रकार कवी लेखक तत्व साहित्यिक रमेश पाटील यांना आला.
ते रांगेत उभे होते, माणसांच्या रांगेत फक्त ते एकटे उभे होते. तरी देखील गिरीश याने सौजन्य न दाखवता. पेमेंट करण्यास असमर्थ दाखवली. उभे असलेल्या लोकांना जणू आपणच पेमेंट देतो अशा अविर्भावात अविर्भावात तो टपाल कार्यालयात निघून गेला. शनिवारचा दिवस महत्त्वाचे काम न होताच नाराज होऊन काही मंडळी निघून गेली. साध्या सौजन्याने कोणी बोलत नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे
ग्राहकांना पेमेंट वेळेवर मिळत नसेल तर? ही सेवा बंद करण्यात यावी अशी ही मागणी काही ग्राहकांनी केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम