
चोपडा तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर
चोपडा तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर
स्व. संध्या मयूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उपक्रम
चोपडा प्रतिनिधी : चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित अध्यापक विद्यालय तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या चोपडा येथील अभ्यासकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या माजी सचिव स्व. संध्याताई मयूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील प्रथम गट आठवी ते दहावी, द्वितीय गट अकरावी, बारावी व डी.एल.एड. प्रथम वर्षाचा होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यातील प्रथम गटात प्रथम क्रमांक स्वरा हरताळकर (विवेकानंद विद्यालय), द्वितीय क्रमांक सुधिक्षण पाटील (पंकज विद्यालय) तर तृतीय क्रमांक हर्षल जाधव (प्रताप विद्यामंदिर) द्वितीय गटात प्रथम क्रमांक नेहाल भोई (सी. बी. निकुंभ विद्यालय,घोडगाव), द्वितीय क्रमांक देवेश महाजन (प्रताप विद्या मंदिर) तर तृतीय क्रमांक दिव्या बारेला (चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित अध्यापक विद्यालय) यांनी मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा शैला मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर, कार्यकारिणी सदस्य चंद्रहास गुजराथी, भूपेद्र गुजराथी, समन्वयक गोविंद गुजराथी, प्राचार्य किरण पाटील तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम