चोपडा तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार

18.75 हेक्टर जमिनीवरील आराखड्यास मंजुरी ; आ. चंद्रकांत सोनावणे यांच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा...

चोपडा तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार

18.75 हेक्टर जमिनीवरील आराखड्यास मंजुरी ; आ. चंद्रकांत सोनावणे यांच्या प्रयत्नांना यश

चोपडा प्रतिनिधी
आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या लेखी मागणीनुसार मुंबई येथे मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली चहार्डी (ता. चोपडा) येथे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठक आणि महत्त्वाचे निर्णय:

चोपडा औद्योगिक क्षेत्रासाठी ताबा प्राप्त जमीन – 20.75 हेक्टर सरकारी जमिनीपैकी 2 हेक्टर अतिक्रमित जागा वगळून उर्वरित 18.75 हेक्टर जमिनीवरील आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

सीमांकन आणि दरनिश्चिती – सदर औद्योगिक क्षेत्राचे सीमांकन करण्यात आले असून, दरनिश्चितीचा प्रस्ताव 11 ऑक्टोबर 2024 रोजी मुख्यालयात सादर करण्यात आला.

आदिवासी क्लस्टर नियोजन – 18 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत मौजे जांबुटके (ता. दिंडोरी, जि. नाशिक) च्या धरतीवर आदिवासी क्लस्टरचे नियोजन करून 90 दिवसांत दर निश्चिती करावी, असे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी दिले.

ताब्यात घेतलेल्या क्षेत्रावर औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी 14 कोटी रुपयांचा प्रस्ताव 27 मार्च 2024 पासून मुख्यालयास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन चहार्डी (ता. चोपडा) येथे जलदगतीने औद्योगिक क्षेत्र विकसित करावे, असे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

या बैठकीला बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार राजन साळवी, उद्योग विभागाचे कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पुलकुंडवार (सहसचिव), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण (मुंबई), संभाजीनगर मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, व्यवस्थापक रागिणी ढसाळ, भूसंपादन अधिकारी राजेंद्र गांधीले, जळगाव प्रादेशिक अधिकारी एस. एस. घाटे, उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम