चोपडा  तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस विक्रीसाठी नावनोंदणीचे आवाहन

बातमी शेअर करा...

 चोपडा  तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस विक्रीसाठी नावनोंदणीचे आवाहन

चोपडा बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी कपास किसान मोबाईल अँपद्वारे मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, सीसीआय कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार असून सन २०२५-२०२६ हंगामासाठी कापसाचा भाव ८११० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी प्ले स्टोअरवरून ‘कपास किसान’ अँप डाउनलोड करून ०१ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत होईल तसेच शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. तसेच गर्दी टाळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी २०२५-२०२६ हंगामाचा पीकपेरा, सातबारा उतारा, आधारकार्ड, फोटो आणि मोबाईल सोबत ठेवावा. सर्व प्रक्रिया मोबाईलवरूनच पार पडतील. काही अडचणी आल्यास बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम