
चोपडा तालुक्यातील रेशनकार्डधारक महिलांना मोफत साडी वितरण
चोपडा तालुक्यातील रेशनकार्डधारक महिलांना मोफत साडी वितरण
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम
चोपडा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमाने चोपडा तालुक्यासाठी पात्र १०२६९ रेशनकार्ड लाभार्थ्यांसाठी शासनातर्फे साड्यांचे वितरण करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाच्या माध्यमातून चोपडा तालुक्यातील १०,२६९ पात्र रेशनकार्डधारक महिलांना मोफत साड्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महिला दिन आणि होळी सणानिमित्त करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रसंगी चोपडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, भाऊसाहेब थोरात तहसीलदार चोपडा, किरण मेश्राम पुरवठा तपासणी अधिकारी, योगेश ननवरे गोदाम व्यवस्थापक, मेघना गरुड पुरवठा निरीक्षक नरेंद्र पाटील सभापती पाटील, घनश्याम अग्रवाल शिवराज पाटील, गोपाल पाटील किरण देवराज रावसाहेब पाटील राजेंद्र पाटील,किशोर चौधरी, विकास पाटील, राजेंद्र जैस्वाल,मेहेमुद बागवान, ए.के. गंभीर सर, महेंद्र धनगर, दिपक चौधरी,मंगल कोळी ,प्रविण कोळी किशोर पाटील , दिव्याक सावंत, प्रदीप बारी बबलू पालीवाल संदीप पाटील , दशरथ बाविस्कर , सुनिल बरडीया, मंगलाताई पाटील कल्पनाताई पाटील, मनिषाताई पाटील, स्वातीताई बडगुजर अनिताताई शिरसाठ शितलताई देवराज नंदु गवळी कैलास बाविस्कर, सचिन महाजन अनुप जैन शिवाजी कोळी गजानन कोळी
हरिष पवार आदी उपस्थित होते.
तसेच चोपडा तालुक्यातील योजनेचे लाभार्थी यांना माननीय चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभहस्ते प्रतिनिधीक स्वरूपात साड्यांचे वितरण करण्यात आले.. प्रसंगी तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि असंख्य नागरिक उपस्थित होते तरी शासनाच्या वतीने लाभार्थ्यांना महिला दिनानिमित्त तसेच होळीनिमित्त शासनाने देण्यात आलेल्या दहा हजार दोनशे एकोंसत्तर साड्यांचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात आलेले आहे..
शासनाच्या वतीने महिला दिन आणि होळी सणानिमित्त देण्यात आलेल्या १०,२६९ साड्यांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रेशन दुकानात संपर्क साधावा. साडी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह रेशन दुकानात भेट देणे आवश्यक आहे. साडी वितरणाची अंतिम तारीख होळीपर्यंत आहे, त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर साडी प्राप्त करून घ्यावी.
या योजनेमुळे चोपडा तालुक्यातील महिलांना सणासुदीच्या काळात आनंद मिळणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम