
चोपडा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडती २१ एप्रिलला
अमळनेरचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार
चोपडा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडती २१ एप्रिलला
अमळनेरचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार
प्रतिनिधी | चोपडा
चोपडा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत येत्या २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सोडत आक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृह, चोपडा येथे अमळनेरचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे.
या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होणार आहे. सोडतीमुळे अनेक इच्छुकांमध्ये उत्सुकता व धाकधूक वाढली आहे.
आरक्षणातील प्रमुख गावे:
आरक्षण सोडतीसाठी ज्या गावांचा समावेश आहे त्यामध्ये नरवाडे, काजीपुरा, अकुलखेडे, वेले, मजरे होळ, मरताड, अर्जती सिम, मोहिये, दगडी, अनवर्दे बु., वढोदे, विटनेर, वाळकी, मालखेडे, अनवदें खुर्य, हातेड खुर्द-बु., गलवाडे, चहाडीं, विचखेडे, घाडवेल, तांदलवाडी, निमगव्हाण, तावसे बु., धनवाडी आदी गावे असून, एकूण ७९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आरक्षणाचे वर्गवारीनिहाय तपशील (पदे):
अनुसूचित जाती – ३
अनुसूचित जमाती – ३
मागास प्रवर्ग – ६
खुला प्रवर्ग – १४
एकूण पदे (महिलांसाठी राखीव सहित) – २७
या आरक्षण सोडतीत गणपूर, भवाळे, वेळोदे, विरवाडे, अंबाडे, माचले, नागलवाडी, आडगाव, कुसंबे, तावसे खुर्द, मंगरुळ आदी ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. आरक्षण सोडतीला संबंधित ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम