चोपडा तालुक्यात राजकीय संस्कृतीचा उदय आणि प्रा.चंद्रकांत सोनवणे

बातमी शेअर करा...

चोपडा तालुक्यात राजकीय संस्कृतीचा उदय आणि प्रा.चंद्रकांत सोनवणे

संस्कृती हा शब्द आपल्याला नवीन नाही.पण राजकीय संस्कृती हा शब्द आपल्याला नवीन वाटू शकतो.पण हा शब्दही राजकीय अभ्यासकांसाठी जूनाच आहे.मागील अनेक वर्षापासून चोपडा तालुक्यात राजकीय संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसून येतो.म्हणून हा शब्दही नवीन वाटणे साहजिकच आहे.कारण राजकीय संस्कृतीमध्ये जनसामान्यांसाठी एखादे विशिष्ट उद्दिष्ट असते.ध्येय असते ,नियम असतात ,व्यवस्था असते ,दृष्टिकोन असतो ,मूल्य असतात,विशिष्ट विचार असतो ,सामान्य लोकांचा आवाज असतो आणि सर्वांत महत्वाचे सामान्य लोकांचा राजकीय सहभाग असतो.पण या सर्व राजकीय संस्कृतीसाठी पोषक ठरणारी रचनेची हानी चोपडा तालुक्यात मागील ४० वर्षांत खूपच होताना दिसते.

मागील १o वर्षापासून म्हणजेच मा.आ.प्रा.चंद्रकांतजी सोनवणे यांच्या नेतृत्वापासून चोपडा तालुक्यात राजकीय संस्कृतीचा कमालीचा उदय आणि विकास झालेला दिसतो.कारण कार्यसम्राट प्रा.चंद्रकांतजी सोनवणे यांनी जनतेचा मनात राजकीय व्यवस्थेविषयी कमालीचा विश्वास निर्माण केला आहे.सामान्य जनतेचा मनात जोपर्यंत राजकीय व्यवस्थेविषयी विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत ते आपले प्रश्न मोकळेपणाने व्यवस्थेसमोर मांडू शकत नाही.प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांचाविषयी सामान्य जनतेचा मनात आस्था निर्माण झाली; परिणामी अनेक गोरगरीब लोकांचे प्रश्न त्यांच्यामुळे मार्गे लागली.प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांच्या कार्यकाळात चोपडा तालुक्यात जनतेचे राजकीय व्यवस्थेबद्दल श्रध्दा,भावना आणि मूल्य प्रदान करण्याचा दृष्टिकोनात प्रचंड वाढ झाली.

प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांचा नेतृत्वा अगोदर लोकांचे राजकीय जाणीव फारच कमी होती.राजकीय मूल्यांकन करण्याची शक्ती जणू चोपड्याचा राजकारण्यांनी जनतेपासून हिरावून घेतली होती.कारण जातीय समीकरणे जोडून सत्ता मिळवण्याचे हातकंडेच मागील ३५ ते ४o वर्षापासून चोपडा तालुक्यात चालू होते.विकास हा शब्दही यांच्या तोंडून कधी ऐकण्यात आला नाही.

जातीच राजकारण हे विकासाचा राजकाणाला मागे सारत होते.त्यामुळे योग्य-अयोग्य ,सत्य-असत्य,न्यायअन्याय इ.क्षेत्रात लोकं विचारच करु शकत नव्हती. पण काळ वेळ बदलत प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांच्या नेतृत्वात लोकांचा राजकीय सहभाग वाढला.लोकं विकासावर चर्चा करू लागली.चोपडा तालुक्यात जातीय राजकारण मागे पडू लागले.लोकांचा राजकीय जाणीवेत वाढ होऊन योग्य-अयोग्याचे मूल्यांकन सामान्य जनता करू लागली.त्याच्यामुळे चोपडा तालुक्याचा इतिहासात पोषक राजकीय संस्कृतीचा उदय झाला.आणि त्याचे श्रेय अर्थातच प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांनाच जाते.

 

प्रकाश क्षीरसागर

मु.पो.खर्डी

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम