चोपडा तालुक्यात सर्वाधिक 80 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाआवास अभियान

बातमी शेअर करा...

चोपडा तालुक्यात सर्वाधिक 80 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाआवास अभियान

चोपडा प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्या 100 दिवसांचा कार्यक्रम अंतर्गत महाआवास अभियान गुहस्तोव 2024/25 अंतर्गत बालेवाडी पुणे येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री   अमित शहा  यांचा अध्यक्षखाली पार पडला.

त्या प्रसंगी 20 लाख घरकुल यांची मंजुरी व प्रथम हप्ता वितरित करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री  अजित  पवार  कार्यक्रम ला उपस्थित राहणार आहेत . तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे  यांचा उपस्थिती मध्ये पार पडला.

चोपडा शासकीय विश्राम गृह येथे चोपडा विधानसभा मतदार संघातील कार्यसम्राट आमदार  चंद्रकांत सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली सौ लताताई सोनवणे माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

जळगांव जिल्हात सर्वाधिक घरकुल हे चोपडा तालुक्यात मंजूर करण्यात आली त्या प्रसंगी उपस्थित तहसीलदार  भाऊसाहेब थोरात , तसेच उपस्थित चोपडा पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री वानखेडे . सहाय्यक गटविकास अधिकारी विसावे . विस्तार अधिकारी श्री जे पी पाटील , इंजि किरण निनायदे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती  नरेंद्र पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती  शिवराज पाटील,  किरण देवराज, माजी उपनगरध्यक्ष  विकास पाटील.माजी नगरसेवक सौ संध्याताई महाजन तसेच सौ स्वातीताई बडगुजर श्री महेंद्र धनगर.  ए के गंभीर ,  कैलास बाविस्कर, श्मंगल इंगळे,  कुणाल पाटील  गणेश पाटील आदी पदाधिकारी व अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.

त्या प्रसंगी 80 लाभार्थी यांना घरकुल मंजुरी आदेश  लताताई सोनावणे यांच्या हस्ते देण्यात आले. एक विशेष समाधान लाभार्थी यांचा चेहऱ्यावर याप्रसंगी दिसून आले. सूत्रसंचालन देवेंद्र सोनवणे सर तर आभार गटविकास अधिकारी वानखेडे  यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम