
चोपडा तालुक्यात सेवा पंघरवडा अंतर्गत तालुका स्तरीय शिबीर संपन्न
चोपडा तालुक्यात सेवा पंघरवडा अंतर्गत तालुका स्तरीय शिबीर संपन्न
चोपडा – राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (दि. 17 सप्टेंबर 2025) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि. 02 ऑक्टोबर 2025) दरम्यान सेवा पंघरवडा अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रा. आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले.

शिबिरात 1800 ते 2000 नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.
उपस्थित मान्यवरांमध्ये नरेंद्र पाटील, कृउबा सभापती चोपडा, नामदेव पाटील (अध्यक्ष, लाडकी बहीण योजना, चोपडा), दिपक चौधरी यांचा समावेश होता. तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरात, प्रभारी गट विकास अधिकारी एन. आर. पाटील, प्रभारी मुख्याधिकारी न. प चोपडा रामनिवास झ्वर, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, पोलिस निरीक्षक चोपडा शहर पो. स्टे मधुकर सावळे, पोलिस निरीक्षक चोपडा ग्रामीण पो. स्टे महेश टाक, सहा. पोलीस निरीक्षक अड़ावद पोलीस स्टेशन प्रमोद वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर, उपविभागीय अभियंता चोपडा विरेंद्र राजपुत, आगारप्रमुख चोपडा महेंद्र पाटील, उपविभागीय अभियंता हतनुर प्रकल्प शाम येवडा, निवासी नायब तहसिलदार योगेश पाटील, नायब तहसिलदार सैंदाणे, नायब तहसिलदार धनगर, नायब तहसिलदार एस. एल. पाटील, पुरवठा अधिकारी मेश्राम व महावितरणचे अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा तसेच सर्व तालुका स्तरीय अधिकारी व महसुल यंत्रणा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पाटील व स्वप्नील कुलकर्णी यांनी केले. या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम