
चोपडा नगरपरिषद रणसंग्रामात युतीची ताकद दाखवणारी भव्य रॅली
चोपडा नगरपरिषद रणसंग्रामात युतीची ताकद दाखवणारी भव्य रॅली
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वात उमेदवारांना मताधिक्याची हमी
चोपडा – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीने शक्तिप्रदर्शन करत भव्य प्रचार रॅली काढली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीने रॅलीला विशेष ऊर्जितावस्था लाभली. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ काढलेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती.

शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या रॅलीदरम्यान दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना थेट संवाद साधत युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. विकासकामांच्या गतीला चालना देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन करत युतीचे उमेदवार ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
रॅलीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, युतीचे अधिकृत उमेदवार, प्रमुख पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. उत्साह, घोषणाबाजी आणि समर्थनाच्या लाटेमध्ये पार पडलेली ही प्रचार मोहीम निवडणुकीत युतीची ताकद अधोरेखित करणारी ठरली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम