चोपडा बाजार समितीचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक विभागातुन द्वितीय तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक

बातमी शेअर करा...

चोपडा बाजार समितीचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक विभागातुन द्वितीय तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक

चोपडा / प्रतिनिधी
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्कृष्ठ,पारदर्शक कामाचा ठसा संपूर्ण नाशिक विभागात उमटवला असून आपल्या पारदर्शक कामाचा,उत्कृष्ट प्रशासनाचा,शेतकरी हिताच्या निर्णयांचा व शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी हमालमापाडी बांधवांसाठी, विविध सेवा सुविधा पुरवून एक उत्कृष्ट सेवा देण्याचे काम केलेले आहे व त्याची दखल म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती संघ पुणे यांनी घेऊन नाशिक विभागात द्वितीय क्रमांकाने तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने चोपडा कृषि बाजार समितीला गौरवण्यात आले या संपूर्ण कामाचे श्रेय बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळांनी कार्यसम्राट आमदार  प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार  सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या कुशल,सेवाभावी व पारदर्शक नेतृत्वाला दिले,तसेच बाजार समिती उत्कृष्ट चालावी शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय व्हावेत याच दृष्टिकोनातून निर्णय घेण्याबाबतचे मार्गदर्शन व सुचना  आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी व माजी आमदार सौ.लताताई  सोनवणे यांनी  सदैव दिलेत असे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित  निकम व .घनश्याम  अग्रवाल यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते असे सांगितले.

यावेळी सभापतींनी संपूर्ण संचालक मंडळाचेही सहकार्य असल्याचे सांगितले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीची भरभराट पन्नास वर्षाच्या कालावधीत कधी दिसून आले नाही की आता दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असुन व सर्वजण सदरील गौरवाबाबतचे कौतुक करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम