चोपडा महाविद्यालयास कबचौ उमवि एकांकिका करंडक स्पर्धेत हॅट्रिक प्राप्त विजेत्यांचा झाला सत्कार
चोपडा महाविद्यालयास कबचौ उमवि एकांकिका करंडक स्पर्धेत हॅट्रिक प्राप्त विजेत्यांचा झाला सत्कार
चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील एकांकिका टीमने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,
जळगाव तर्फे आयोजित एकांकिका करंडक २०२३ स्पर्धेत ‘पडदा’ एकांकिका सादर करीत सलग तीन वर्षे दमदार विजय संपादन करून विजयाची हॅट्रिक संपादन केली आहे.
त्यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘सत्कार समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी कलावंत विद्यार्थी व संघ प्रमुख डॉ. हरेश गंभीर चौधरी तसेच दिग्दर्शक मकरंद चौधरी यांनी या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डाॅ.स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड.संदीप सुरेश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डाॅ.स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस.कोल्हे, रजिस्ट्रार डी. एम. पाटील, संघप्रमुख डॉ. हरेश चौधरी व मुख्य दिग्दर्शक मकरंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघ प्रमुख डॉ. हरेश चौधरी यांनी केले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच संघप्रमुख व दिग्दर्शक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव एकांकिका करंडक स्पर्धा २०२३’ या स्पर्धेतील सर्वच प्रकारांमध्ये चोपडा एकांकिका समूहाने सलग तिसऱ्या वर्षी ‘पडदा’ ही एकांकिका सादर करीत विजयाची परंपरा कायम राखून भरघोस पारितोषिके प्राप्त केली.
यामध्ये ‘पडदा’ एकांकिकेला सांघिक प्रथम एकांकिकेचे पारितोषिक प्राप्त झाले. तसेच हर्षल संजय पाटील या विद्यार्थ्याला संगीत योजनेचे प्रथम, पूनम भगवान बडगुजर या विद्यार्थिनीला दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक,
निलेश प्रकाश माळी व योगेश राजेश चित्रकथी या विद्यार्थ्याला प्रकाश योजनेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, रचना नंदकिशोर अहिरराव या विद्यार्थिनीला अभिनय स्त्री प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, हर्षल रघुनाथ निकम या विद्यार्थ्याला उत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
तर तेजल राजेंद्र पाटील या विद्यार्थिनीने उत्कृष्ट अभिनय सादर करीत अभिनय नैपुण्य प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच सागर खैरनार, तुषार सोनवणे, कुणाल रुकमे, शितल पाटील, छाया चित्ते, कोमल पाटील, कोमल भदाणे,
पुरुषोत्तम पाटील, दिपेश शुक्ल, कुलभूषण दोडे या विद्यार्थ्यांनी बॅकस्टेज म्हणून भूमिका साकारली. संघ प्रमुख डॉ. हरेश चौधरी यांनी यावेळी स्पर्धेबाबतचे अनुभव कथन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील यांनी विजेत्या स्पर्धकांचे, दिग्दर्शक, संघ प्रमुख यांचे अभिनंदन व कौतुक केले. याप्रसंगी ते म्हणाले की,
‘आपल्या ग्रामीण भागातील महाविद्यालयाचे विद्यार्थी मुंबई व पुणे शहरातील एकांकिकांच्या सादरीकरणासारखे सादरीकरण करतात ही उल्लेखनीय व कौतुकास्पद बाब आहे.
म्हणून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नाट्य क्षेत्रातील या संधीचे सोने करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाळगल्यास यश नक्कीच मिळेल यात शंका नाही’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार डॉ. हरेश चौधरी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
हे वाचा👇
भडगाव शहरातील मेन रोडवर अवजड वाहनांना बंदी करा अन्यथा अंदोलन : तालुकाध्यक्ष दिनेश महाजन
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम